Saturday, 29 June 2019

पोषण आहार शिट,इयत्ता-६वी ते ८वी करिता.

पोषण आहार शिट

2019-2020

इयत्ता-६वी ते ८वी करिता.


वैशिष्ट्ये

1)Home टॅब वरील माहिती भरा वर्ष निवडा. त्या त्या वर्षाचे तारखा व वार आपोआप येतील.रविवार हा सुट्टीचा वार आल्यास तारीख आपोआप लाल रंगाची होईल तसेच रविवारी धान्य व धान्यदी माल भरण्याची टॅब आपोआप बंद होईल.


2)दैनिक नोंदवाहीची संपूर्ण महिन्याची प्रिंट काढणे सोपे केले आहे.


3)मासिक अहवाल आपोआप तयार होईल.त्याचीपण प्रिंट काढता येईल.प्रिंट सेटिंग केली आहे.


4)वार्षिक अहवाल आपोआप तयार होईल.त्याची प्रिंट काढणे सोपे केले आहे.



cसूचनाd


1)HOME शिटमधे शैक्षणिक वर्ष या सेल समोरील वर्ष बदलले कि पुढील वर्षाकरिता देखील या शिट चा वापर करता येईल.


2)’अहवाल या शिटवर कोणतीही माहिती भरू नये.तेथे सर्व माहिती अपोआप तयार होईल.सुरुवातीलाच याexcelच्या दोनcopyकरून एक-१ते५साठी तर दुसरी-६ते८साठी वापरावी.


3)अहवालाची प्रिंट काढू शकता.सर्व प्रिंटletter साईझ सेट केल्या आहेत.कृपया प्रिंटींगची सेटिंग बदलू नये


4)HOME  या शीट मध्ये शाळेची सर्व माहिती व पट भरा.प्रमाणच्या चौकोनात धान्य व धान्यादि मालाचे प्रमाण काळजीपूर्वक भरा.मागील शिल्लक रकान्यात मागील शिल्लक भरा.

5)धान्य प्राप्त झाल्यास दैनिक नोंदवहीत प्राप्त दिनांक dropdown ने निवडा व प्राप्त या रो मध्ये प्राप्त धान्याची नोंद करा.
6)मासिक नोंदवहीत दर रोज पटउपस्थिती व प्रमाणचा कोड भरणे आवश्यक आहे. प्रमाण बदललेले असेल तर तो कोड HOME’शिट मधे नारंगी चौकोनात "b"कॉलममधे भरा. बदल नसेल तर ''a"  हा कोड भरावा.HOME शिट मधे "प्रमाणवर्गानुसार भरणे आवश्यक आहे.

7)मासिक नोंदवहीची व अहवालाची दर महिन्याची प्रिंट घेवून ती शाळेच्या फाईलला जतन करू शकता.


8)मोबाईल मध्ये या excelचा वापर करावयाचा असल्यास Microsoft excel हे app डाऊनलोड करावे.google input चा मराठी font वापरावा.

9) दैनिक नोंदवहीत F6 मध्ये शाळेचा एकूण पट नोंदवा.मासिक अहवालात D7 मध्ये अपोआप येईल.

खालील चित्राला क्लिक करावे
 .

1 comment:

  1. How to download this sheet sirji.i make all 5th to 8th MDM .so guide me plz.

    ReplyDelete